म्हशींमध्ये जंत निर्मूलन करणे आवश्यक आहे
14 February 07:30

म्हशींमध्ये जंत निर्मूलन करणे आवश्यक आहे


म्हशींमध्ये जंत निर्मूलन करणे आवश्यक आहे

म्हशींमधील जंत निर्मूलन
- नवजात रेडके, पारडे, तसेच म्हशींना प्रामुख्याने चपटे कृमी, गोलकृमी आणि पर्णाकृती कृमी अशा जंतांचा प्रादुर्भाव होतो.
- जंत म्हशीच्या पोटात, आतडे, यकृतामध्ये असतात.
- भूक मंदावते, हगवण लागते.
- शेण पातळ होऊन दुर्गंधीयुक्त वास येतो.
- दूध उत्पादन कमी होते.
- कातडी खडबडीत व निस्तेज होते.
- म्हशी अशक्त होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
- रेडकामध्ये अपेक्षित वाढ होत नाही व वजन घटते.
- एॅनिमिया होऊन अशक्तपणा येतो.

प्रतिबंध-
- रेडकांना जन्मल्यानंतर १० दिवसांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशक द्यावे.
- कोणत्या जंताचा प्रादुर्भाव अाहे याचे निदान करण्यासाठी शेणाची प्रयोगशाळेत तपासणी करावी व औषध द्यावे. याचा चांगला परिणाम होतो.
- १ वर्षाखालील म्हशींना दर दोन महिन्यांतून जंतनाशक द्यावे.
- गाभण म्हशींना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाचा वापर करावा.
- लसीकरण करण्याअगोदर १० दिवस जंतनाशक द्यावे, यामुळे रोगप्रतिकारकशक्ती उत्तम मिळते.

-डॉ. एम. व्ही. इंगवले.
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या