अंडी उत्पादनात घट होण्याची कारणे
05 February 07:30

अंडी उत्पादनात घट होण्याची कारणे


अंडी उत्पादनात घट होण्याची कारणे

१) स्वच्छ पाणी उपलब्ध नसणे
अंडयामध्ये ६० ते ७०% पाणी असते त्यामुळे अंडयावरील कोंबड्यांना सतत स्वच्छ आणि मुबलक पाणी पिण्यास उपलब्ध हवे, पाणी हे निर्जंतुक केलेले असावे. तसेच पाणी देण्याची भांडी ही वारंवार स्वच्छ करावीत, पाणी स्वच्छ सूती कपड्याने गाळून घ्यावे तसेच पाण्यमध्ये ई कोलाई किंवा सालमोनेला ह्या आजारांचे विषाणु कमीत कमी असावेत.

२) संतुलित आहार नसणे
अंडी उत्पादन सुरु होताच म्हणजे २० ते २२ आठवडे वय असताना कोंबड्यांना उच्च प्रथिने (१६%) आणि ऊर्जायुक्त असलेला संतुलित आहार पूरवावा, मुक्त पद्धत असेल तर नैसर्गिक किडा, मुंगी, गवत आणि इतर नैसर्गिक आहार सोडून प्रति पक्षी किमान ८० ते ९० ग्रॅम संतुलित आहार द्यायला हवा नाहीतर अंडी उत्पादनावर परिणाम होतो.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या