जनावरांमधील क्षारांच्या कमतरतेची लक्षणे
02 February 09:00

जनावरांमधील क्षारांच्या कमतरतेची लक्षणे


जनावरांमधील क्षारांच्या कमतरतेची लक्षणे

कॅल्शियम, फॉस्फरस, कोबाल्ट, कॉपर, आयर्न, आयोडीन, सेलेनियम, क्रोमिअम इ क्षारांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या प्रजनन संस्थेवर अनिष्ट परिणाम होतो. क्षारांच्या कमतरतेमुळे वार न पडणे, कालवडी योग्य वयात माजावर न येणे, गर्भपात होणे, अशक्त वासरांना जन्म देणे, गर्भाशयाचा दाह, वळूंमध्ये वंध्यत्व येणे यासारख्या प्रजोत्पादनाशी निगडीत समस्या निर्माण होतात. या क्षारांची कमतरता टाळण्यासाठी जनावरांच्या आहारात लसूनघास, दशरथ व इतर हिरव्या चाऱ्याबरोबर क्षार मिश्रणाचा उत्पादनाच्या व वजनाच्या प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे.

- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर.टॅग्स

संबंधित बातम्या