शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट भाग-३
19 January 09:00

शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट भाग-३


शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट भाग-३

पारंपरिक पद्धतीच्या चाऱ्यामध्ये मका, ज्वारी त्याचबरोबर लसूण घास ( लुसर्न) हा देखील खूप पौष्टिक आहे. हायब्रीड नेपियर, गिनी गवत , पॅरा गवत हे देखील हिरव्या चाऱ्याचे चांगले स्रोत आहेत.
सुका चारा म्हणून मका व ज्वारीचा कडबा , सोयाबीनचे भुसकाट, किंवा प्रक्रिया केलेला इतर सुका चारा वापरता येतो.

मुरघास- चांगल्या प्रतीचा हिरवा चारा हवाबंद करून कमीत कमी ४५ दिवस साठवून ठेवल्यास त्याचा पौष्टीक मुरघास तयार होतो व तो आपल्याला शेळ्यांसाठी वर्षभर वापरता येतो. दुष्काळी परिस्थितीत मुरघासाचा खूप चांगला उपयोग होतो. यासाठी मका या पिकाचा जास्त वापर केला जातो.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिण्याचे पाणी. शेळ्यांना पिण्यासाठी मुबलक व स्वच्छ पाणी असले पाहिजे. बंदिस्त पद्धतीच्या गोठ्यामध्ये तहान लागल्यावर शेळ्यांना मुबलक पाणी पिता येते.

स्त्रोत: पॉवरगोठाटॅग्स

संबंधित बातम्या