दर्जेदार दुध उत्पादनासाठी उच्च दर्जाचा गोठा आवश्यक आहे
09 January 07:30

दर्जेदार दुध उत्पादनासाठी उच्च दर्जाचा गोठा आवश्यक आहे


दर्जेदार दुध उत्पादनासाठी उच्च दर्जाचा गोठा आवश्यक आहे

उच्च दर्जाचा गोठा
शक्यतो आपला गोठा मुक्त गोठाच असला पाहिजे. ज्यात आपण कमी कष्टामध्ये जास्त गाई अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो.

या गोठ्यामध्ये होलस्टीन (HF) गाईंसाठी गारवा मिळावा म्हणून उंच शेड किंवा झाडाची सावली असावी. गोठ्याचे तापमान वेळोवेळी तपासावे.

वेळोवेळी गोठ्या मध्ये निर्जंतुकीकरण करून आपला गोठा जिवाणूमुक्त (बॅक्टेरिया मुक्त) ठेवला पाहिजे. गोठ्या मध्ये स्वच्छता राखली पाहिजे. मुक्त गोठ्यामध्ये ऊन पडत असेल तर आपोआप शेण वाळून साफसफाईची गरज राहत नाही. मात्र पारंपरिक गोठ्यात कोबा वगैरे असेल तर वेळच्या वेळी सफाई करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

स्त्रोत: पॉवरगोठाटॅग्स

संबंधित बातम्या