असे करा प्रतिजैविके विरहित दूधउत्पादन...
08 January 07:30

असे करा प्रतिजैविके विरहित दूधउत्पादन...


असे करा प्रतिजैविके विरहित दूधउत्पादन...

प्रतिजैविके विरहित दूध (बॅक्टेरिया फ्री मिल्क)
गाईंना आजारी पडल्यास औषधे दिली जातात. यात प्रतिजैविके म्हणजे अँटी-बायोटिक्स चे प्रमाण खूप असते. यामधील काही प्रतिजैविके थेट दुधामध्ये आढळून येतात. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये जर अशा प्रकारची प्रतिजैविके दुधामध्ये दिसल्यास त्या दुधाचा दर्जा कमी पकडला जातो. हे दूध मानवी आरोग्याला हानिकारक समजले जाते, म्हणजेच अंतिमतः त्या दुधाला कमी प्रतीचे मानून त्याचा परिणाम त्याला कमी दर मिळण्यात होतो.

उच्च दर्जाचे दूध म्हणजे प्रतिजैविके विरहित आणि सोमॅटीक पेशी संख्या (somatic cell count) – पांढऱ्या आणि तत्सम पेशींचे दुधातील प्रमाण, कमी असणे होय. अशा प्रकारच्या दुधाला परदेशात खूप मागणी असते. भारतीय दूध निर्यात दर्जा प्राप्त ना करू शकण्याची दुधातील प्रतिजैविक आणि सोमॅटीक पेशींचे जास्त प्रमाण ही मुख्य कारणे आहेत.

मुक्त गोठ्यामध्ये गाय आजारी पडू नये याची काळजी आपोआप घेतली जाते. गाय आजारी कमीवेळा पडली की तिला बरे करण्यासाठी प्रतिजैविकांची गरज भासत नाही किंवा कमी प्रमाणात ही औषधे लागतात. परिणामतः दुधात दिसणारी प्रतिजैविके कमी होऊन दुधाचा दर्जा वाढतो.

त्या व्यतिरिक्त उच्च प्रतीचा हिरवा चारा, मिनरल मिक्श्चर, पेंड, खनिजे यांचा पुरवठा, लसीकरण, उच्च दर्जाची रेतन प्रक्रिया इत्यादी गोष्टींमधून उच्च प्रतीच्या दुधाची निर्मिती संभव आहे.

स्रोत: पॉवरगोठासंबंधित बातम्या