दुग्ध व्यवसाय: गाय की म्हैस ?
06 January 09:00

दुग्ध व्यवसाय: गाय की म्हैस ?


दुग्ध व्यवसाय: गाय की म्हैस ?

दुग्ध व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर म्हशी की गायी फायदेशीर असा प्रश्न अनेकांना पडतो. बहुतेक उत्तर देणारे हे गायी, म्हशींच्या वेगवेगळ्या पैलुंची तुलना करतात. पण नेमके उत्तर देताना अडखळतात. गायी व म्हशींचे अशी तुलना करणेच चुकीचे आहे. गाय (मग ती देशी, संकरित, विदेशी असो) ही तिच्या जागेवर स्थिर उभी आहे, तर म्हशीने स्वतःची जागा घट्ट पकडून ठेवली आहे. मंडळी एक लक्षात ठेवा खुल्या बाजारात ज्या दूधाला काही आढेवेढे न घेता क्षणाक्षणाला मागणी आहे, याचा सारासार अभ्यास करून ते पाळणाऱ्याने ठरवायचे आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास एका ठिकाणी ट्रेनिंगला प्रात्यक्षिक केलेले आहे. एकाच गवळ्याने दोन केटलीत वेगवेगळे दूध घेऊन जाणे. एकात जर्सी, गीर गायीचे शुद्ध, ताजे दूध व दुसऱ्यात निम्मे पाणी घातलेले म्हशीचे दूध. दोघांचे भाव सारखे ठेवावेत. गिऱ्हाईक दोन्ही केटलीतले दूध बारकाईने पाहील. त्याचे 10/12 थेंब हातावर घेईल व त्याचा आवड म्हशीच्या दुधाला सर्वप्रथम राहील. असा जिवंतपणा असूनसुद्धा दोन्ही पशुंचे दूध संकलन जोरात चालू आहेत. पण ते विकत घेणारे दोन्ही ग्राहकवर्ग वेगवेगळे आहेत हे विसरतां कामा नये.

डॉ. वासुदेव सिधये, पशु व पक्षी रोग तज्ज्ञ.टॅग्स

संबंधित बातम्या