पशुंसाठी संतुलित आहार
05 January 09:00

पशुंसाठी संतुलित आहार


पशुंसाठी संतुलित आहार

जो आहार पशुंच्या शरीराची झीज भरून काढून त्यांना आनुवंशिकतेनुसार उत्पादन देण्यास भाग पाडेल (दूध, मांस, वासरू इ.) तसेच त्यांचे आयुष्य आजार,रोग प्रतिकारक्षम करील असा आहार म्हणजे संतुलित आहार.

संतुलित आहाराचे शास्त्रीय घटक
पाणी: पिण्यासाठी पाणी २४ तास उपलब्ध होईल असे नियोजन पाहिजे.
हिरवा ओला व कोरडा चारा: कोणतीही गवते, कडवळ, मका, बाजरी, जव, गहू, ऊस, उसाची हिरवीगार वाढी, बीट, ल्सुसर्न, बरसीम, मोहरी, घेवडा, सुबाभूळ, शेवरी, स्टायलो इ.
मूरघास (सायलेज): भरपूर प्रमाणात हिरवा चारा असेल तर एकदल, द्विदल चाऱ्याचे मिश्रणाचे बनविलेला तसेच धान्य घेतल्यानंतर मका, ज्वारी यांची हिरवी ताटे कुटी करून त्यांत विशिष्ट प्रकारची आहारपुरके, रसायने घालून तयार केलेला.
तेलबियांच्या पेंडी: शेंगदाणा, सोयाबीन, करडई, सरकी, जवस, तीळ, सूर्यफूल, मका, मोहरी, खोबरा.
चुनी: द्विदल वर्गातील डाळी तयार करतांना खाली राहिलेला भूसा त्यात चना, मूग, उडिद, मसूर, तूर, हुलगा इ.
भूसा, कोंडा: भातापासून तांदूळ काढतांना खाली राहिलेला भूगा, गव्हापासून मैदा करताना राहिलेला भाग, एकदल धान्यातून राहिलेला भाग.

एकदल धान्याचा भरडा: मका, गहू, ज्वारी, बाजरी, जव, नाचणी, वरी, तांदूळ वगैरे
साखरेच्या कारखान्यातील चांगली मळी: ऊस बीट चे समतोलपणे केलेले अनेक घटकीय मिश्रण.
खनिज मिश्रणे: प्रामुख्याने कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम या मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या खनिजांचा सहभाग तसेच
सूक्ष्म खनिजे: कॉपर (तांबे), कोबाल्ट, सेलेनियम, मँगेनिज, मॅग्रेशियम, आयर्न (लोह), झिंक (जस्त).
जीवनसत्त्वे: जीवनसत्त्व अ, ब, क, ड इ इत्यादी

डॉ. वासुदेव सिधये, पशु व पक्षी रोग तज्ज्ञ.टॅग्स

संबंधित बातम्या