पशूंच्या आहारातील बायपास प्रथिने
03 January 07:30

पशूंच्या आहारातील बायपास प्रथिने


पशूंच्या आहारातील बायपास प्रथिने

बायपास प्रथिने याचा अर्थ समजण्याअगोदर ज्या प्राण्यांना (म्हणजे रवंथ करणाऱ्या) हे खाऊ घालतो त्यांच्या पोटातील पचनाचे कार्य अगदी थोडक्यात समजावून घेऊ या. रवंथ करणाऱ्या पशूंमध्ये चार पोटे असतात. या प्राण्यातील ८० ते ८५ टक्के अन्नाचे पचन विशिष्ट प्रकारच्या आंबवण्याच्या क्रियेने होत असतात. आंबवण्याच्या या प्रक्रियेला ४ ते ५ प्रकारच्या वेगवेगळ्या लाखो कोटी जिवाणूमुळे हातभार लागतो. (माणसांमध्ये किंवा रवंथ न करणाऱ्या प्राण्यांमध्ये हे पचन ८० ते ८५ टक्के पाचक रसाने होतो). आहारातील घटकावर हे जीवाणू प्रहार करतात त्यांचे पचन घडवून आंबविण्याची प्रक्रिया सुरु करतात. त्यांच्यापासून जी विविध पचनीय द्रव्ये, वायू निर्माण होतात या सर्वांचा त्यांच्या स्वतःच्या वाढीसाठी, प्रजननासाठी भरपूर प्रमाणात उपयोग करून घेतात. त्यांचे जनन/मरण चालूच असते. हे अतिशय मोलाची जैविक प्रथिने तयार करून गायी/म्हशींच्या शरीराला पुरवीत असतात. या प्रक्रियेत आहारातील माध्यमातून दिलेल्या प्रथिनातून काही प्रथिनांवर या जीवाणूकडून प्रक्रिया होत नाही. मग ही प्रथिने जशीच्या तशी चौथ्या पोटात व पुढे आतड्यात जाऊन त्यांच्यावर पाचकरसांची थोडीफार प्रक्रिया होऊन रक्तात मिसळली जातात व पुढे उत्पादनाला वापरली जातात. या प्रथिनांना बायपास प्रथिने म्हणतात.

पशुखाद्याच्या विविध घटकांमध्ये ही कमी-जास्त प्रमाणात किंवा कधीकधी नसतात सुद्धा. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मका, मक्याचे ग्लूटन, सरकी पेंड, सोयाबीन, माश्याची कुट्टी यात बायपास प्रथिने जास्त प्रमाणात आहेत. सोयबीनमध्ये नैसर्गिक बायपास प्रथिने आहेत. सोयाबीनवर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केल्यास ही प्रथिने जास्त प्रमाणांत उपलब्ध होऊन त्यांची पचनीयता जास्त वाढते.

-डॉ. वासुदेव सिधये, पशु व पक्षी रोग तज्ज्ञ.टॅग्स

संबंधित बातम्या