गाय आटवताना काय काळजी घ्यावी
18 December 07:30

गाय आटवताना काय काळजी घ्यावी


गाय आटवताना काय काळजी घ्यावी

गायीच्या प्रकृतीच्या दृष्टीने गाभन काळात कासेला योग्य आराम मिळणे गरजेचे आहे. गर्भधारणेनंतर ६ वा महीना सुरु होताच गाय आटवन्याची प्रक्रिया सुरु होते. शास्त्रीयदृष्टया गायीस किमान १०० दिवस आणि म्हशीस १२० ते १५० दिवस आटवने गरजेचे आहे. याकाळात गर्भाची ७० टक्के वाढ होत असते. तसेच दूध निर्माण करणाऱ्या पेशींचे पुनर्जीवन होत असते. गाय आटवताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही स्थिती अत्यंत नाजूक असून अशा काळात गायीच्या शरीरावर ताण येऊ शकतो. शेतकरी दुधाच्या हव्यासापोटी आटवन्यास उशीर करतात आणि एकदम खाद्य बंद करून लवकर आटवन्याचा प्रयत्न करतात. शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं की या स्थितीमध्ये गायीला मिळणाऱ्या आहारामध्ये दूध निर्मिती, गर्भाचे पोषण स्वतःच्या शरीराची जडणघडण आणि पोषण करायचे असते त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

गाय आटवण्यासाठी काय कराल?
गर्भधारणेच्या तारखेनुसार ६ वा महीना कधी सुरु होतो हे माहिती करून ६ वा महीना लागताच टप्प्याटप्याने खुराक कमी करा. ओल्या वैरणी ऐवजी सुक्या चाऱ्याचे प्रमाण वाढवा. कासेकडून दूध निर्मिती कमी होऊ लागताच दूध काढण्यात अंतर द्यायला सुरुवात करा. साडे सहा महीने होईपर्यंत एका वेळेलाच धार सुरु करा.त्यानंतर दूध कमी होताच एक दिवस आड़ अणि नंतर 3 दिवस आड़ गायीचे दूध पूर्ण बंद करा. शेवटची धार काढ़ताना पूर्ण सड़ पिळून घ्या आणि पशुवैद्यक यांच्या सल्ल्यानुसार सडामध्ये प्रतिजैविक टयूब सोडावे ज्यामुळे कासदाह सारख्या आजारांवर नियंत्रण राहील.

गाय आटवताना गोठा स्वच्छ राहील याची काळजी घ्या. तसेच गोठयातील जमीन कोरडी राहील याची काळजी घ्या. सडाला किंवा कासेला जखम असेल तर दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार करून घ्या. गायीला भरपूर पाणी पिता येईल याची काळजी घ्या. गाय आटल्यानंतर कास सुके पर्यंत खुराक देऊ नका. कास सुकल्यावर मात्र गरजे एवढा खुराक आणि आंबोण तसेच खनिज आणि गूळ वरचेवर द्यायला हवा. गायींचे योग्य वजन वाढल्यास पुढील वेतामध्ये सुदृढ वासरु आणि उत्तम दूध मिळू शकते.

प्रीतम नलावडे, बीई (मेकॅनिकल)
मोबाईल : ८४०८८०५६६१
-पॉवर गोठा (दुग्ध व्यवसाय)टॅग्स

संबंधित बातम्या