जनावरांचे स्वास्थ व औषधी वनस्पती भाग-१
02 December 09:00

जनावरांचे स्वास्थ व औषधी वनस्पती भाग-१


जनावरांचे स्वास्थ व औषधी वनस्पती भाग-१

शरपुंखा (उन्हाळी), भुई आवळी (भू-आमली), तुळस, अश्वगंध या औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती असतात. त्यांचा उपयोग योग्य प्रमाणात केल्यास आपल्याला जनावरांचे स्वास्थ चांगले ठेवण्यास नक्कीच मदत होईल.

जनावरांच्या स्वास्थासाठी औषधी वनस्पतींचा उपयोग हा प्राचीन काळापासून केला जात आहे. जनावरांच्या वाढीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती, दूध उत्पादन वाढविण्यासाठी, जनावरांचे रोग कमी करण्यासाठी औषधी वनस्पतीचा खालीलप्रमाणे उपयोग होतो.
1) तुळस:
औषधी उपयोग: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी (कोंबड्यांमध्ये विशेष प्रवाही)
कोणत्या जनावरांना वापरावी: शेळ्या व कोंबड्या
कोणत्या प्रकारे वापरावी: तुळशीच्या वाळविलेल्या पानांची भुकटी
प्रकार/पद्धत/मात्रा: शेळ्या रोज 4 ग्रॅम 3 दिवस
कोंबड्या: रोज 2 ग्रॅम प्रत्येकी 1 किलो खाद्यातून दोन आठवडे

2) शरपुंखा:
औषधी उपयोग: अशक्तपणा दूर करून वजन वाढीसाठी
कोणत्या जनावरांना वापरावी: वासरे, शेळ्या, मेंढ्या
कोणत्या प्रकारे वापरावी: वाळवलेल्या पानांची भुकटी खाद्यातून
प्रकार/पद्धत/मात्रा: रोज 10 ग्रॅम खाद्यातून 60 दिवस

3) भुई आवळी (भूआमली):
औषधी उपयोग: अशक्तपणा, यकृत विकार दूर करून भूक प्रज्वलित करणे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी
कोणत्या जनावरांना वापरावी: गाई, म्हशी, बैल, वासरे, शेळ्या, मेंढ्या
कोणत्या प्रकारे वापरावी: वाळविलेल्या वनस्पतीची भुकटी खाद्यातून
प्रकार/पद्धत/मात्रा: मोठी जनावरे: रोज 30 ग्रॅम
वासरे, शेळ्या: 6 ते 8 ग्रॅम 30 ते 60 दिवसापर्यंत

4) अश्वगंधा:
औषधी उपयोग: नवजात वासरास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून अपमृत्यू टाळण्यासाठी
कोणत्या जनावरांना वापरावी: गाई म्हशींची 3 ते 4 आठवडे वयांतील वासरे
कोणत्या प्रकारे वापरावी: अश्वगंधा वनस्पतीच्या मुळांची वाळविलेली भुकटी
प्रकार/पद्धत/मात्रा: नवजात वासरे: रोज 3 ग्रॅम याप्रमाणे 60 दिवसांपर्यंत

लेखक- प्रा. सहाणे प्रणिता प्रतापराव,
सा. प्राध्यापक ए. बी. एम. कॉलेज,संगमनेर.टॅग्स

संबंधित बातम्या