जनावरांमधील होणाऱ्या घटसर्प रोगाची लक्षणे व ईलाज
29 November 07:30

जनावरांमधील होणाऱ्या घटसर्प रोगाची लक्षणे व ईलाज


जनावरांमधील होणाऱ्या घटसर्प रोगाची लक्षणे व ईलाज

घटसर्प रोगाची लक्षणे व ईलाज:
लक्षणे: जीवाणूजन्य आजार असून Plasteurella multocide जिवाणूंमुळे होतो. विशेषतः म्हैसवर्गामध्ये अधिक प्रमाणात आढळतो काही वेळा गाय व शेळ्या मेंढ्यांमध्ये होतो. बाधित जनावरांना अचानक भरपूर ताप येतो. घसा व जिभेस सूज येते, तोंडातून भरपुर लाळ गळते, श्वासोच्छवासास त्रास होतो व घरघर आवाज येतो. न्युमोनिया होतो व तातडीने उपचार न मिळाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते.

ईलाज: तीन महिन्यांपुढील जनावरास दर वर्षी पावसाळयापूर्वी मे-जून महिन्यात लसीकरण करावे. गाय/ म्हशीसाठी ५ मिली आणि शेळी व मेंढ्यांसाठी २.५ मिली. याप्रमाणे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

-डॉ. ऋषिकेश काळे, पशुधन विकास अधिकारी पुणे.



टॅग्स

संबंधित बातम्या