जनावरांची वीर्य कांडी ज्या गरम पाण्यात टाकतात त्या पाण्याचे तापमान किती असावे?
21 November 07:30

जनावरांची वीर्य कांडी ज्या गरम पाण्यात टाकतात त्या पाण्याचे तापमान किती असावे?

जनावरांची वीर्य कांडी ज्या गरम पाण्यात टाकतात त्या पाण्याचे तापमान किती असावे?

"डॉक्टर लोक वीर्य कांडी ज्या गरम पाण्यात टाकतात. त्या पाण्याचे तापमान विशिष्ट असणे गरजेचे आहे का?"

विशिष्ट तापमान असलेले स्वच्छ पिण्याचे पाणी ह्या कामाकरिता वापरले पाहिजे. वीर्य कांडीत वीर्य हे गोठविलेल्या अवस्थेत म्हणजे बर्फासारखे घट्ट असते. त्याचे द्रवात रूपांतर केल्याशिवाय ते गर्भाशयात सोडता येत नाही. ह्या करिता गायीच्या वळू करिता ३५ ते ३७ डिग्री सेंटीग्रेड व म्हशीच्या रेड्याकरिता ४० डिग्री सेेंटिग्रेड तापमानाचे पाणी घेतले पाहिजे. ते तापमान मोजण्याकरिता लॅबोरेटरी थर्मामीटर किंवा डिजीटल थर्मामीटरचा वापर करावा. कांडी खिशात आणणे, कांडी दोन हाताच्या तळव्यात धरून चोळणे, हाताने पाण्याचे तापमान पहाणे... वगैरे बाबी ह्या शुद्ध फसवणुकीच्या आहेत.

-डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०टॅग्स

संबंधित बातम्या