गायी/ म्हशींच्या माजाचा स्त्राव (सोट, बळस) पाण्यासारखा पातळ का असतो?
20 November 07:30

गायी/ म्हशींच्या माजाचा स्त्राव (सोट, बळस) पाण्यासारखा पातळ का असतो?


गायी/ म्हशींच्या माजाचा स्त्राव (सोट, बळस) पाण्यासारखा पातळ का असतो?

बऱ्याचवेळा गायी/ म्हशींच्या गर्भाशयाच्या अंतत्त्वचेचा जेव्हा दाह होतो तेव्हा सोट पाण्यासारखा होतो. तसेच संतुलित आहार न मिळाल्यास सोट तयार करण्याच्या प्रक्रियेला बाधा येते. आहारामध्ये कॅल्शियम, कॉपर, फॉस्फरस व कोबाल्ट ह्यांचा अभाव असल्यास सोट पातळ होणे, बीजांडकोशाच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यास तसेच माजाच्या काळाचा अगदी शेवट आला असता जेव्हा माजाच्या स्त्रावाचा रंग पिवळट, तांबूस गुलाबी, दुधासारखा पांढरा असेल तर गर्भाशयात जिवाणूंचा (मायक्रोऑरगॅनिझम) संसर्ग झाला आहे असे समजावे. तसेच असा पाण्यासारखा पातळ सोट किती दिवस पडतो तेही पाहणे महत्त्वाचे आहे. ज्या भागांत ऊस, ऊसाची वाढे, भाताचा पेंढा, ग्लुकोज कंपनीतील ओले मक्याचे फोलपट, ऊसाचे पाचट जास्त प्रमाणात खावू घालतात तेथेही अडचण जास्त प्रमाणात दिसते त्यामुळे गायी / म्हशी गाभण राहण्यास त्रास होतो.

- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या