जनावरांसाठी आरोग्यदायी औषधी वनस्पती: हिंग व सुंठ(आले)
03 October 09:00

जनावरांसाठी आरोग्यदायी औषधी वनस्पती: हिंग व सुंठ(आले)


जनावरांसाठी आरोग्यदायी औषधी वनस्पती: हिंग व सुंठ(आले)

हिंग: हिंग हा फेरुला फोइटिडा या वनस्पतीच्या मुळाचा रस सुकवुन त्यापासुन बनविलेला एक पदार्थ आहे. त्याचा वापर पूड व अर्क या स्वरुपात करतात.
याला पिवळसर तपकिरी रंग असून तिव्र वास व चव असते.

औषधी उपयोग:
१) याचा उपयोग जंतूनाशक आणि दुर्गंधीनाशक म्हणून करतात.
२) तसेच वायुसारक, कृमिनाशक, उत्तेजक, कफ पातळ करणारा, पोटफुगी व अपचन झाल्यास
३) पोटदुखी व श्वसनसंस्थेच्या दाहामध्ये

कोणत्या जनावरांना वापरावी:
मोठी जनावरे (गाय,बैल,मैह्स) व लहान जनावरे (शेळी आणि मैंढ़ी)
कोणत्या प्रकारे वापरावी:
पावडर व द्रावण स्वरुपात

प्रकार / पद्धत / मात्रा:
जनावरे पावडर (ग्रॅम) द्रावण (मि.ली.)
मोठी जनावरे १५ ते २० ग्रॅम १५ ते २० मि.ली.
लहान जनावरे १० ते १५ ग्रॅम ५ ते १० मि.ली.

सुंठ (आले):
औषधी उपयोग:
१) आले सुकवून सुंठ तयार करतात.
२) उत्तेजक, लाळवर्धक, जठरस्राववर्धक

कोणत्या जनावरांना वापरावी:
मोठी जनावरे (गाय,बैल,मैह्स) व लहान जनावरे (शेळी आणि मैंढ़ी)
कोणत्या प्रकारे वापरावी:
सुंठ पावडर किंवा द्रावण स्वरुपात वापरावी.

प्रकार/ पद्धत/ मात्रा:
जनावरे पावडर (ग्रॅम) द्रावण (मि.ली.)
मोठी जनावरे १५ ते ३० ग्रॅम ३० ते ४० मि.ली.
लहान जनावरे ०५ ते १० ग्रॅम १ ते २ मि.ली.

-लेखक: प्रा.प्रणिता सहाणे.
(सा. प्राध्यापक, ए.बी.एम.कॉलेज, गुंजाळवाडी पठार)संबंधित बातम्या