वासरांतील परजीवींचे नियंत्रण
21 September 09:00

वासरांतील परजीवींचे नियंत्रण


वासरांतील परजीवींचे नियंत्रण

परजीवीमध्ये अस्कॅरीस व्हिटूलोरम हा 10- 15 सें. मी. लांबीचा गोलाकार कृमी असून याचा प्रादुर्भाव गर्भाशयामध्येच होतो किंवा जन्मल्यानंतर होऊ शकतो. वासराच्या जन्मानंतर पूर्ण कृमी आतड्यामध्ये तयार होतात. हा कृमी शेळी- मेंढीच्या करडांमध्ये आढळत नाही. हा कृमी वासरांच्या पचनसंस्थेस हानी पोचवितो, अन्नद्रव्य शोषण करतो. आतड्याच्या संभाव्य हालचालींमध्ये बाधा आणतो. अन्नद्रव्यांचे पचन योग्य पद्धतीने न झाल्याने वासराचा मृत्यू होतो. परजीवींचे जीवनचक्र हे खरपड्यामध्ये पूर्ण होते. खरपड्यामधील त्यांची अर्भक अवस्था जनावरांच्या खाण्यात आल्यासच लागण होते. गवतासोबत खरपडे पोटात गेल्यामुळे लागण होते.

लक्षणे: वासरे आवमिश्रित, घाण वास येणारी संडास करतात. संडास करते वेळेस त्रास होतो. वासराच्या पाठीमागे बाक तयार होतो. वासरू खंगत जाते. म्हशीच्या रेड्यामध्ये या कृमींमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. या कृमीचे पिवळसर रंगाचे तुकडे विष्ठेद्वारा बाहेर पडतात, यावरून निदान करता येते.

उपाय: लक्षणे दिसताच तात्काळ कृमिनाशक औषधांची शिफारशीत मात्रा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावी. गवतावरील खरपड्यांची (ऑरीबॅटीड माइट्‌स) संख्या वाढल्याचे लक्षात आल्यास गवत कापून वाळवून नंतरच पशुधनास खाण्यास द्यावे.

-डॉ.नरळदकर, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी
स्त्रोत: विकासपिडिया.टॅग्स

संबंधित बातम्या