पावसाळ्यात होणारा दगडीकास रोग
01 August 09:00

पावसाळ्यात होणारा दगडीकास रोग


पावसाळ्यात होणारा दगडीकास रोग

अधिक उत्पादनक्षम मादी जनावरांमध्ये दगडीकास रोगाचे प्रमाण जास्त असते आणि पावसाळ्यात अशी जनावरे दगडीकास रोगास लवकर बळी पडतात. एकदा जर जनावराला दगडीकास रोग झाला तर मग भविष्यात त्या जनावरापासून मिळणाऱ्या दुग्ध उत्पादनात कायमची घट होत जाते. पावसाळ्यातील वातावरण रोगकारक जीवजंतूस पोषक असल्याने वातावरणात तसेच गोठा अस्वच्छ किंवा चिखल असल्यास त्यात जंतूचे प्रमाण जास्त असते. जनावर खाली बसल्यावर कासेचा प्रत्यक्ष संबंध रोगकारक जीवजंतू सोबत येऊन जनावरांना दगडीकास रोग होतो. हा रोग टाळण्यासाठी गोठा नियमित स्वच्छ करून त्याचे निर्जंतुकीकरण करावे. दूध काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावे. व दूध काढण्याअगोदर हात स्वच्छ धुवावे. दूध काढण्याअगोदर व नंतर कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवून काढावी. एका जनावराचे दूध काढून झाल्यावर दुसऱ्या जनावराचे दूध काढायचे असल्यास परत हात स्वच्छ धुवावे व नंतरच दुसऱ्या जनावराचे दूध काढावे. दूध काढण्याकरिता मशीन वापरत असल्यास मशीनचे सुद्धा नियमित निर्जंतुकीकरण करावे. दगडीकास रोगाची शंका आल्यास पशुवैद्यकाकडून लगेच योग्य तो उपचार करून घ्यावा.

डॉ. रणजीत सुरेश इंगोले
सहायक प्राध्यापक, पशुविकृतीशास्त्र विभाग,
पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या