पीक सल्ला: सुरु उसाची मोठी बांधणी करून खत द्यावे
09 May 07:00

पीक सल्ला: सुरु उसाची मोठी बांधणी करून खत द्यावे


पीक सल्ला: सुरु उसाची मोठी बांधणी करून खत द्यावे

उशीरा लागण झालेल्या सुरू उसास मोठ्या बांधणीच्या वेळी 100 किलो नत्र (217 किलो युरिया),55 किलो स्फुरद(334 किलो सिंगल सुपर फॉस्फेट)आणि 55 किलो पालाश (92 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) अशी प्रती हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.युरियाची मात्रा देताना निंबोळी पेंडीची बारीक भुकटी एक किलो व सहा किलो युरिया असे प्रमाण ठेवावे. पट्टा पद्धत आणि सूक्ष्म जलसिंचन पद्धत यांचा अवलंब केल्यास उसावरील पाण्याचा ताण कमी करता येईल.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या