खरीप कांदा रोपवाटिकेत रोग प्रतिबंधक उपायांचा अवलंब करा
26 April 07:00

खरीप कांदा रोपवाटिकेत रोग प्रतिबंधक उपायांचा अवलंब करा


खरीप कांदा रोपवाटिकेत रोग प्रतिबंधक उपायांचा अवलंब करा

खरीप कांद्याच्या रोपवाटिकेकरिता एक हेक्टर क्षेत्रामध्ये रोपांच्या उपलब्धतेकरिता साधारणपणे 0.05 हेक्टर जागेत रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी 5-7 किलो बियाण्यांची आवश्यकता असते. गादीवाफे 10-15 सें.मी.उंच,1मीटर रुंद आणि सोईनुसार लांब तयार करावेत.तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथेलीन 2 मि.ली. प्रति लीटर या प्रमाणात फवारावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम 1-2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळविण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडीचा 1250 ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणे कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा.

-डॉ.शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचानलाय, राजगुरूनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या