पीक सल्ला: ऊसावरील हुमणी आणि कांडीकिडीचे वेळीच नियंत्रण करा
06 April 07:00

पीक सल्ला: ऊसावरील हुमणी आणि कांडीकिडीचे वेळीच नियंत्रण करा

पीक सल्ला: ऊसावरील हुमणी आणि कांडीकिडीचे वेळीच नियंत्रण करा

ऊस पिकात हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपक्रम सामुदायिकरित्या करावा. उसावर कांडीकिडीचा प्रादुर्भाव असल्यास 5-6 ट्रायकोकार्डस प्रति हेक्टरी मोठ्या बांधणीनंतर दर 15 दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी 1 महिन्यापर्यंत लावावी.

-डॉ.एस.एम.पवार,
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या