पीक सल्ला: उन्हाळी नांगरट व पूर्व मशागत
30 March 07:00

पीक सल्ला: उन्हाळी नांगरट व पूर्व मशागत


पीक सल्ला: उन्हाळी नांगरट व पूर्व मशागत

रब्बी उन्हाळी पिकाची काढणी झाल्यावर जमिनीची खोल नांगरणी करावी. यामुळे जमिनीतील किडींच्या सुप्तावस्था चिरडून मरतात अथवा खोलवर गाडल्या जातात. या अवस्था जमिनीवर आल्यास पक्षी वेचून खातात किंवा कडक उन्हात मरतात.

उन्हाळी नांगरणीमुळे कीड, रोग व तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. शेतात समतल रेषा (कंटूर) काढून या रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी मशागत करावी. प्रति हेक्टरी शेतीकरिता 10 बाय 2 बाय 1 मीटर आकाराचा खड्डा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खोदावा.

-राहुल वडस्कर, अशोक पाटील,
कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या