पीक सल्ला: ऊस बांधणी
28 March 07:00

पीक सल्ला: ऊस बांधणी


पीक सल्ला: ऊस बांधणी

सिंचनाची सोय असल्यास सुरु उसाची मोठी बांधणी करून घ्यावी. सुरु उसाच्या मोठ्या बांधणीच्या वेळी १०० किलो नत्र (२१७ किलो युरिया), ५५ किलो स्फुरद(३४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५५ किलो पालाश (९२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी द्यावे. उसाला युरियाची मात्रा देतांना निंबोळी पेंडीची भुकटी एक किलो व सहा किलो युरिया असे प्रमाण ठेवावे. पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत असून उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

-डॉ. एस. एम. पवार,
ऊस विशेषज्ञ, सी आर सी पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या