द्राक्ष पीक सल्ला
26 March 10:40

द्राक्ष पीक सल्ला


द्राक्ष पीक सल्ला

द्राक्ष बागेत जर पाण्याची उपलब्धता असेल तर बोद पूर्णपणे भिजेल याची काळजी घ्यावी. त्यामुळे उपलब्ध क्षेत्रातील मुळींचा विकास चांगला होण्यास मदत होईल. गेल्या हंगामात घडावर सावली करण्याकरिता बागेत शेडनेट किंवा पानांचा वापर केला असेल तर छाटणीनंतर सुरुवातीचे आठ दिवस हे शेडनेट तसेच राहू द्यावे त्यामुळे तापमान कमी होऊन आर्द्रता वाढण्यास मदत होईल. व बाग १२ ते १३ दिवसात फुटू शकेल. बाग फुटण्याच्या कालावधीत उडद्या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या किडीचा नायनाट करण्याकरिता आवश्यक त्या कीटकनाशकाची फवारणी करावी. उडद्या किडीने काडीवरील फुगलेला डोळा पोखरल्यास नवीन फुट निघणार नाही किंवा जळून जाईल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स

संबंधित बातम्या