पीक सल्ला: कांदा गोंडे काढणे
19 March 07:00

पीक सल्ला: कांदा गोंडे काढणे


पीक सल्ला: कांदा गोंडे काढणे

कांदा गोंडे काढणे: साधारणपणे 3 ते 4 वेळा कांद्याच्या गोंड्यांची काढणी हाताने खुडून करावी लागते. गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून 5 ते 6 दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यांमधून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफवनी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले व पोचट बी वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे.

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.विजय महाजन,
भाकृअनुप- कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या