लिंबूवर्गीय पीक सल्ला
15 March 07:00

लिंबूवर्गीय पीक सल्ला


लिंबूवर्गीय पीक सल्ला

लिंबूवर्गीय फळपिकांना शक्यतोवर पाणी देण्यासाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. झाडाला दररोज किंवा एक दिवस आड याप्रमाणे पाणी देता येईल. दहा वर्षेवरील फळातील संत्रा झाडाची ठिबकद्वारे पाण्याची गरज 117 लिटर/झाड प्रती दिवस तर लिंबू झाडाची गरज 105 लि./झाड/दिवस एवढी आहे. आळ्याने पाण्याचे नियोजन करत असल्यास दुहेरी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ज्या भागात मार्च मध्येच पाणी कमतरता येत असेल व लिंबू हस्त बहारातील फळे झाडावर असल्यास आणि ठिबकची सोय नसल्यास एकेरी द्यांडेने आलटून-पालटून पाणी द्यावे. आळ्यात आच्छादनाचा वापर करावा.

डॉ. दिनेश हरिदास पैठणकर,
अखिल भारतीय समन्वयीत फळे संशोधन प्रकल्प, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या