कांदा पीक सल्ला
13 March 07:00

कांदा पीक सल्ला


कांदा पीक सल्ला

कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रितीने ठेवावा की, दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. तीन दिवस शेतामध्ये सुकवल्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात 2 ते 2.5 सें.मी. लांब नाळ (माना) ठेवून कापावी. नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत 10-12 दिवस राहू द्यावे.

-डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.विजय महाजन
भाकृअनुप- कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या