लसूण पीक सल्ला
12 March 07:00

लसूण पीक सल्ला


लसूण पीक सल्ला

लसूण पिकाची काढणी व साठवण करतांना लहान कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावे. फुटलेले गड्डे तसेच लहान गड्डे प्रतवारी करून वेगळे करावेत. काढलेल्या लसणाची पाने ओली असतांना २० ते २५ सारख्या आकाराच्या गड्यांची जुडी बांधावी व पानांची वेणी बांधून घ्यावी. जुड्या झाडाखाली किंवा बाजू उघड्या असलेल्या छपरीत १५ दिवस सुकवाव्यात. त्यानंतर साठवणगृहात ठेवाव्यात.

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ. विजय महाजन.
भाकृअनुप- कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या