पीक सल्ला: द्राक्ष फळ छाटणी
10 March 07:00

पीक सल्ला: द्राक्ष फळ छाटणी


पीक सल्ला: द्राक्ष फळ छाटणी

द्राक्ष फळ छाटणीच्या १५ दिवस अगोदर चारी घ्यावी. छाटणी घेतांना काडी सरसकट एक डोळ्यांवर राखून छाटणी घ्यावी. छाटणी नंतर दुसऱ्या दिवशी डोळ्यांवरती हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करावी यामुळे बाग लवकर व एकसारखी फुटते. यावेळी बाग फुटण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे वातावरणातील तापमान व आर्द्रता. मार्च महिन्यात तापमान वाढीसोबत आर्द्रता कमी होण्यास सुरुवात होते त्यामुळे बाग लवकर फुटण्यावर परिणाम होतो, यावर उपाय म्हणून दिवसातून दोनदा वेलींवर पाणी फवारावे. यामुळे आर्द्रता निर्माण होऊन बाग लवकर फुटण्यास मदत होईल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या