शेवगा सल्ला: असे करा छाटणीचे नियोजन
09 March 07:00

शेवगा सल्ला: असे करा छाटणीचे नियोजन


शेवगा सल्ला: असे करा छाटणीचे नियोजन

- नवीन शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असते. झाडाला व्यवस्थित आकार न दिल्यास ते उंच वाढून शेंगा काढणी अवघड होते. त्यामुळे झाडाला आकार देण्याची गरज असते. त्यासाठी खोड पुरेशा उंचीपर्यंत वाढल्यानंतर त्याची छाटणी करावी. तसेच त्याखालील चांगली जाडी असणाऱ्या चार फांद्या चार दिशांना ठेवून इतर फांद्यांची छाटणी करावी.
- त्यानंतर ७ ते ८ महिन्यांनंतर चारही फांद्या मुख्य खोडापासून १ मीटर अंतरावर छाटाव्यात. अशा पद्धतीने छाटणी केल्याने झाडाचा मुख्य सांगाडा तयार होतो. झाडाची उंची कमी होऊन पुढील हंगामात शेंगा काढणी सोपी जाते.
- हंगाम संपलेल्या बागांमध्ये वाळलेल्या फांद्या व फळे काढून टाकावीत.
- बागेस पाणी न देता ताण द्यावा.
- बागेत व्ही ब्लेडने मशागत करून जमीन भुसभुशीत ठेवावी.

-डॉ. विजय अमृतसागर, डॉ. व्यंकटेश आकाशे,
कोरडवाहू फळपीक संशोधन केंद्र, सोलापूर.टॅग्स

संबंधित बातम्या