उसामध्ये द्रवरूप जिवाणू खते वापरण्याचे फायदे
07 March 07:00

उसामध्ये द्रवरूप जिवाणू खते वापरण्याचे फायदे


उसामध्ये द्रवरूप जिवाणू खते वापरण्याचे फायदे

- द्रवरूप खते संपृक्त स्वरूपात असतात, त्यामुळे त्यांची मात्रा कमी प्रमाणात लागते.
- पिकांच्या उगवणीमध्ये ८ ते २२ टक्के वाढ होऊन मुळांची वाढ चांगली होते.
- नत्र, स्फुरद, पालाश, गंधक व इतर मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी रासायनिक खतांची २५ ते ५० टक्के बचत होते.
- पीकवाढीसाठी आवश्यक पदार्थांची निर्मिती करतात. उदा. जिब्रॅलिक ॲसिडमुळे उगवण शक्ती वाढते.
- जमिनीची जैविक सुपीकता वाढते.
- जमिनीचा पोत सुधारून पाणी वापर कार्यक्षमता वाढते. पाण्याचा ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते.
- पिकांची उगवण क्षमता, फुटवे येण्याची क्षमता, मुळांची संख्या, फूल व फळ धारण करण्याची क्षमता वाढते.
- उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते, त्याची प्रत सुधारते.
- द्रवरूप डिकंपोझिंग कल्चर जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात, त्यामुळे कर्ब व नत्र यांचे गुणोत्तर सुधारते.
- काही जीवाणूंनी तयार केलेल्या प्रतिजैविकांमुळे रोगकारक बुरशीचे नियंत्रण होते.
- पिकाची रोग व कीड प्रतिकार क्षमता वाढते.

- ऋतुजा राजेंद्र मोरे, शास्त्रज्ञ व विभागप्रमुख,
कृषिसुक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या