उसामध्ये द्रवरूप जीवाणू खते वापरण्याचे प्रमाण
06 March 07:00

उसामध्ये द्रवरूप जीवाणू खते वापरण्याचे प्रमाण


उसामध्ये द्रवरूप जीवाणू खते वापरण्याचे प्रमाण

२.५ लिटर प्रति हेक्टरी (साधारणत: प्रति हेक्टरी १० ते १३ टन पाचट निघते.)
द्रवरूप जिवाणू खते वापरावयाच्या पद्धती
बेणेप्रक्रिया: ॲसिटोबॅक्टीर द्रवरूप जिवाणू खत १ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे किंवा बियाणे १० ते ३० मिनिटे बुडवावे. नंतर सावलीत वाळवून लागवड करावी.

फवारणी: द्रवरूप जिवाणू खतांची पिकावर फवारणी केल्यास पिकाच्या अंतर्गत भागात ते अधिक परिणामकारक ठरतात. फवारणीसाठी प्रति हेक्टरी फवारणीसाठी वापरावयाचे जिवाणू मिश्रण ३ लिटर प्रति ७५० लिटर पाणी याप्रमाणात वापरावे.

रोपप्रक्रिया: रोपाची मुळे बुडतील इतके पाणी घ्यावे. त्या पाण्यात प्रतिलिटरला १० मि.लि. द्रवरूप जिवाणू खत मिसळावे. या द्रावणात मुळ्या १० ते २० मिनिटे बुडवाव्यात व नंतर पुनर्लागवड करावी.

जमिनीत वापर: जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण प्रति हेक्टरी २.५ लिटर प्रति ७५० लिटर पाणी किंवा १५०० किलो शेणखत/ कंपोस्ट खत/ माती यात मिसळावे. ते जमिनीत सर्वत्र सारखे पसरले जाईल असे फवारावे किंवा मिसळावे. झारी, फवारणी पंप किंवा सूक्ष्म सिंचन संच प्रणालीद्वारे द्रवरूप जिवाणू खतांची मात्रा वापरता येते.

गांडूळ खत आणि कंपोस्ट खत संवृद्धीकरण: प्रतिटन गांडूळ खतासाठी जमिनीत वापरावयाचे द्रवरूप जिवाणू मिश्रण १ लिटर या प्रमाणात वापरावे.

-ऋतुजा राजेंद्र मोरे, शास्त्रज्ञ व विभागप्रमुख,
कृषिसुक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या