उसामध्ये द्रवरूप जीवाणू खते वापरण्याच्या वेळा
05 March 07:00

उसामध्ये द्रवरूप जीवाणू खते वापरण्याच्या वेळा


उसामध्ये द्रवरूप जीवाणू खते वापरण्याच्या वेळा

- उसात लागवडीनंतर ६० दिवसांपासून मोठ्या बांधणीपर्यंत (१२० दिवस)
- खोडवा उसात ऊस तुटल्यानंतर ४५ दिवस ते मोठ्या बांधणीपर्यंत
- फवारणी सकाळी ११ च्या आत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.

पाचट व इतर सेंद्रिय पदार्थ विघटन करणारे जिवाणू
शेतातील वाया जाणारे पदार्थ उदा. पालापाचोळा, कचरा, उसाचे पाचट बरेच जण जाळून टाकतात. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील जिवाणू नष्ट पावतात. जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचे सेंद्रिय पदार्थ वाया जातात.
शेतातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन केल्यास उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते. त्याच्या वापराने जमिनीची जैविक सुपीकता व पोत सुधारतो. जमीन भुसभुशीत होते. हवा खेळती राहून पिके चांगली वाढतात. उत्पादनात वाढ होते.

-ऋतुजा राजेंद्र मोरे,
शास्त्रज्ञ व विभागप्रमुख, कृषिसुक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या