ऊस सल्ला: खोडवा उसाचे नियोजन भाग-२
04 March 07:00

ऊस सल्ला: खोडवा उसाचे नियोजन भाग-२


ऊस सल्ला: खोडवा उसाचे नियोजन भाग-२

• को ७५२७ या जातीचा खोडवा घेऊ नये.
• फेब्रुवारीपूर्वी तोडणी झालेल्या उसाचाच खोडवा राखावा, किडग्रस्त क्षेत्र असल्यास खोडवा ठेऊ नये. तसेच कमीत कमी १ लाख उसाची संख्या असलेल्या क्षेत्राचाच खोडवा ठेवावा.
• १० ते २० आठवडे वय असणाऱ्या खोड्व्यास ९ किलो नत्र, ५ किलो स्फुरद व ३ किलो पालाश ही अन्नद्रव्ये ७ दिवसाच्या अंतराने ११ हप्त्यात ठिबकमधून द्यावीत. ५ ते ९ आठवडे वय असणाऱ्या खोड्व्यास १४ किलो नत्र, ६.५ किलो स्फुरद व ३ किलो पालाश ही अन्नद्रव्ये ७ दिवसाच्या अंतराने ५ हप्त्यात विभागून द्यावीत. तर १ ते ४ आठवडे वय असणाऱ्या खोड्व्यास ७.५ किलो नत्र, २.५ किलो स्फुरद व २.५ किलो पालाश ही अन्नद्रव्ये ७ दिवसाच्या अंतराने ४ हप्त्यात विभागून द्यावीत.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या