ऊस सल्ला: खोडवा उसाचे नियोजन भाग-१
03 March 07:00

ऊस सल्ला: खोडवा उसाचे नियोजन भाग-१


ऊस सल्ला: खोडवा उसाचे नियोजन भाग-१

• ऊस तोडणीनंतर पाचट सतीत दाबून घ्यावे.
• उसाचे बुडखे मोकळे करू धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत व त्यावर ०.१ % बाविस्टीन (कार्बेन्डॅझीम) फवारावे. पाचट कुजविण्यासाठी पाचटावर प्रती हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सुपर फॉस्फेट व १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू शेणखतात मिसळून पाचटावर टाकावेत.
• पहिले पाणी दिल्यावर ३-४ दिवसांनी वाफसा आल्यावर हेक्टरी १५० किलो नत्र (३२५ किलो युरिया), ७० किलो स्फुरद (४३७ किलो सुपर फॉस्फेट) व ७० किलो पालाश (११७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत. तसेच झिंक सल्फेट २० किलो फेरस सल्फेट २५ किलो प्रती हेक्टरी याप्रमाणे द्यावीत.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या