ऊस सल्ला: उसाचे खत नियोजन
02 March 07:00

ऊस सल्ला: उसाचे खत नियोजन


ऊस सल्ला: उसाचे खत नियोजन

• ६-८ आठवडे वयाच्या सुरु उसाला नत्र खताचा दुसरा हप्ता ४० टक्के नत्र (२१७ किलो युरिया) आणि १२ आठवडे वयाच्या सुरु ऊसाला नत्र खताचा तिसरा हप्ता १० टक्के नत्र (५५ किलो युरिया) निंबोळी पेंडीबरोबर ६:१ या प्रमाणात द्यावा व दुसऱ्या दिवशी पाणी द्यावे. जमिनीतील ओल पाहून ८-१० दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
• ठिबक सिंचनाची सोय असल्यास डिसेंबरमध्ये लागण केलेल्या उसाला ९ नत्र, ५ किलो स्फुरद व ३ किलो पालाश ही अन्नद्रव्ये ठिबकमधून सात दिवसाच्या अंतराने अकरा समान हप्त्यात प्रती हेक्टरी द्यावीत. जानेवारीमध्ये लागण केलेल्या उसाकरिता वाढीच्या अवस्थेनुसार १४ किलो नत्र, ६.५ किलो स्फुरद व ३ किलो पालाश ही अन्नद्रव्ये ७ दिवसाच्या अंतराने ५ समान हप्त्यात प्रती हेक्टरी द्यावीत. फेब्रुवारीमध्ये लागण केलेल्या उसाकरिता वाढीच्या अवस्थेनुसार ७.५ किलो नत्र, २.५ किलो स्फुरद व २.५ किलो पालाश ही अन्नद्रव्ये ७ दिवसाच्या अंतराने ४ समान हप्त्यात प्रती हेक्टरी द्यावीत.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या