कांदा सल्ला: बिजोत्पादनाच्या कांद्याची काळजी भाग-२
01 March 07:00

कांदा सल्ला: बिजोत्पादनाच्या कांद्याची काळजी भाग-२


कांदा सल्ला: बिजोत्पादनाच्या कांद्याची काळजी भाग-२

१. सर्व गोंडे एकदम तयार होत नाहीत. ते जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे तीन चार वेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत.
२. गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले व पाचट बी वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे.
३. मळणी केलेले बी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या