कांदा सल्ला: बिजोत्पादनाच्या कांद्याची काळजी भाग-१
28 February 07:00

कांदा सल्ला: बिजोत्पादनाच्या कांद्याची काळजी भाग-१


कांदा सल्ला: बिजोत्पादनाच्या कांद्याची काळजी भाग-१

कांदा बीजोत्पादनाच्या उभ्या पिकाकरिता
१. फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा किटकनाशक फवारल्यास मधमाशांना हानी पोहोचते.
२. अत्यंत आवश्यक असेल तरच हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना हानी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी.
३. मधमाशांची संख्या कमी झाल्यास एकरी एक-दोन मधमाशांच्या पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवावाव्यात.
४. पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.
५. सामान्यतः बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यात ५० टक्के बी काळपट दिसू लागल्यास गोंडे काढायला सुरुवात करावी.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या