केळी सल्ला: नवीन केळी बागेची काळजी घ्या भाग-२
27 February 07:00

केळी सल्ला: नवीन केळी बागेची काळजी घ्या भाग-२


केळी सल्ला: नवीन केळी बागेची काळजी घ्या भाग-२

• लागवडीनंतर ४-५ लिटर पाणी प्रतिदिन द्यावे. दोन तीन दिवसानंतर रोपाभोवतीची माती पायाने दाबावी.
• लागवडीनंतर शेणखत १० किलो, अॅझोस्पीरीलम व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम प्रती झाड या प्रमाणात द्यावे.
• केळी लागवडीच्या वेळी बागेभोवती सजीव कुंपण (शेवरी, बांबू, गजराज गवत) लावले नसल्यास हिरव्या शेडनेटचे वारा प्रतिरोधक उभारावे त्यामुळे बागेचे उष्ण हवेपासून संरक्षण होते.
• केळीची वाळलेली पाने (रोगविरहित), ऊसाचे पाचट, गव्हाचा भुसा, सोयाबीन भुसा यांचा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे.
• बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने केओलीन हे बाष्परोधक ८ टक्के (८०० ग्रॅम) १० लिटर पाण्यात फवारावे.

डॉ. विक्रांत भालेराव,
सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, धुळे.टॅग्स

संबंधित बातम्या