पीक सल्ला: खरबुज व टरबुज पिकांची काळजी
25 February 07:00

पीक सल्ला: खरबुज व टरबुज पिकांची काळजी


पीक सल्ला: खरबुज व टरबुज पिकांची काळजी

खरबुज व टरबुज पिकांची काळजी
• जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड केलेल्या खरबुज व टरबुज पिकांना फळधारणा होउन फळे मोठे होण्याची प्रक्रीया चालु असेलच तेव्हा फळाच्या खाली तसेच वर उन्हापासुन संरक्षण करण्याकरीता गवताने/वाळलेल्या तणाने फळे झाकावीत. तसेच पिकास पाण्याचा ताण बसु देऊ नये. काही फळे काढणीस तयार झालेली असल्यास काढणी करावी. काढणी केल्यावर फळे प्रथम सावलीत ठेवावीत नंतर प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.

वेलवर्गीय भाजीपाल्याची काढणी
• जानेवारी फेब्रवारीमध्ये लागवड केलेल्या भाजीपाला पिकापैकी काकडी, कारली, दोडके (शिरी व चोपडे), भेापळे व ढेमसे र्इ. पिके काढणीस तयार असतील. या पिकांचीसुध्दा दर तीन चार दिवसांनी काढणी करावी. प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्री करावी.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलासंबंधित बातम्या