ऊस सल्ला: सुरु उसाचे नियोजन
24 February 07:00

ऊस सल्ला: सुरु उसाचे नियोजन


ऊस सल्ला: सुरु उसाचे नियोजन

• सुरु उसाची लागण झालेल्या क्षेत्रावर उगवण विरळ झाली असल्यास त्या ठिकाणी लागणीच्या वेळी प्लास्टिक पिशवीत अथवा गादीवाफ्यावर वाढवलेली समवयस्क रोपे वापरून नांग्या भरून घ्याव्यात व त्वरित हलके पाणी द्यावे.
• खोडकीडीच्या नियंत्रणासाठी लागणीनंतर ४५ दिवसांनी बाळबांधणी करावी. उसात मका, ज्वारी ही आंतरपिके न घेता कांदा , लसून, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत. खोडकीडग्रस्त उस मुळासह उपटून अळीसह नष्ट करावा. हेक्टरी ५ ट्रायकोकार्ड १० दिवसाच्या अंतराने ३ वेळा लावावीत. खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे उसाचे शेंडे वाळत असतील तर आवश्यकता असल्यास क्लोरअँट्रानीलीप्रोल ०.४ % दाणेदार हे कीटकनाशक १८.७५ किलो अथवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार हे कीटकनाशक २५ ते ३० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात वापरावे.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या