द्राक्ष सल्ला: अशी करा फुटींची निवड
22 February 07:00

द्राक्ष सल्ला: अशी करा फुटींची निवड


द्राक्ष सल्ला: अशी करा फुटींची निवड

रिकट घेतल्यानंतर बागेत पाणी जास्त प्रमाणात दिले जाते. त्याचवेळी वाढते तापमान व पाणी दिल्यामुळे वाढलेली आर्द्रता फुटींच्या वाढीकरिता पोषक असते. यासाठी बऱ्याचशा बागेमध्ये मोकळे पाणीसुद्धा दिले जाते. अशा वेळी नवीन निघालेल्या फुटींचा वापर खोड तयार करण्याकरिता करावा. काडीवर निघालेल्या फुटीपैंकी वरची फूट ३-४ पानांवर शेंडा पिंचींग करून घ्यावी. खालची फूट बांबुस सुतळीने बांधावी. वरच्या फुटीचा शेंडा खुडल्यास खालील फूट जोरात वाढेल. वरील फूट भविष्यात गरज पडल्यास कामी येईल.

बऱ्याच बागांमध्ये काडीत रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिवाणू तसेच असतात. अनेक वेळा एकाच कात्रीने आपण बागेतील पूर्ण कलमवेलीचा रिकट घेतो. अशा वेळी रोगग्रस्त काडीवरून सशक्त व रोगमुक्त काडीवर संसर्ग (infection) होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत वरील फूट टाळणे फायद्याचे होईल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या