द्राक्ष सल्ला: रिकट घेण्याअगोदर पानगळ करा
21 February 07:00

द्राक्ष सल्ला: रिकट घेण्याअगोदर पानगळ करा


द्राक्ष सल्ला: रिकट घेण्याअगोदर पानगळ करा

रिकट घेत असताना वातावरणातील तापमान वाढण्यास सुरवात होत असते. मात्र, रिकटनंतर डोळे फुटण्याइतके पुरेसे तापमान व आर्द्रता नसते. परिणामी रिकट नंतर पुन्हा डोळे फुटण्यास वेळ लागतो. यासाठी पानगळ करून काडीवरील डोळे चांगले फुगवून घ्यावेत. त्यामुळे नवीन फुटी एकसारख्या व लवकर फुटतात. ज्या ठिकाणी रिकट घेणार आहोत, त्या जागेच्या वर ३-४ पाने व खालील ३-४ पाने हाताने गाळून घ्यावीत किंवा त्यासाठी इथेफॉनचा वापर करावा. बागेतील पाणी सुमारे आठवडाभर बंद करावे. वेलीवर ताण बसून पानगळ होण्यास मदत होईल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.



टॅग्स

संबंधित बातम्या