केळी सल्ला: उन्हाळ्यात केळी बागेची काळजी घ्या
17 February 07:00

केळी सल्ला: उन्हाळ्यात केळी बागेची काळजी घ्या


केळी सल्ला: उन्हाळ्यात केळी बागेची काळजी घ्या

• करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, रोगग्रस्त पानांचा भाग किंवा पाने बागेबाहेर नेऊन जाळावीत. झाडावर १० ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा २५ ग्रॅम डायथेन एम-४५ किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
• केळी लागवडीच्या वेळी बागेभोवती सजीव कुंपण (शेवरी, बांबू, गजराज गवत) लावले नसल्यास हिरव्या शेडनेटचे वारा प्रतिरोधक उभारावे.
• केळीची वाळलेली पाने (रोगविरहित), ऊसाचे पाचट, गव्हाचा भुसा, सोयाबीन भुसा यांचा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे.
• बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने केओलीन हे बाष्परोधक ८ टक्के (८०० ग्रॅम) १० लिटर पाण्यात फवारावे.

डॉ. विक्रांत भालेराव, सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, धुळे.टॅग्स

संबंधित बातम्या