भाजीपाला सल्ला: भेंडी, गवार व चवळी काढणी
16 February 07:00

भाजीपाला सल्ला: भेंडी, गवार व चवळी काढणी


भाजीपाला सल्ला: भेंडी, गवार व चवळी काढणी

• जानेवारीमध्ये लागवड केलेल्या भेंडी, गवार व चवळी हि पिके आतापर्यंत तोडणीस तयार झालेली असतील. या पिकांची तोडणी नेहमी कमी उष्णतामानाच्या वेळेस म्हणजे सकाळी किंवा शक्य न झाल्यास दुपारनंतर (म्हणजेच संध्याकाळी) करावी. तोडणी केलेली भाजीपिके प्रथम सावलीत मोकळी ठेवावीत. नंतर त्यांची प्रतवारी करुन त्यांची ओलसर केलेल्या पोत्यामधुनच अथवा टोपल्यामध्ये पॅकींग करावी. टोपल्यांना ओलसर पोत्यांनी बंद करावी. भाजीपाल्यावर पाणी टाकु नये. नंतर पॅकींग केलेली भाजीपाला पिके बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.
• सोबतच या पिकांना पाणी देण्याकडे लक्ष दयावे त्यामध्ये दोन पाळीतील अंतर हवामान आणि जमिनीचा मगदुर यानुसार ठरवावे तसेच आवश्यकतेनुसार किटकनाशकांची फवारणी करावी व फवारणीनंतर ७-८ दिवस काढणी करु नये.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलासंबंधित बातम्या