द्राक्ष सल्ला: घडावर सुकवा येण्याची कारणे
15 February 07:00

द्राक्ष सल्ला: घडावर सुकवा येण्याची कारणे


द्राक्ष सल्ला: घडावर सुकवा येण्याची कारणे

द्राक्ष घडावर सुकवा येण्याची परिस्थिती महत्वाच्या कारणाने दिसून येईल. एकतर वेलीवर द्राक्षघडांची संख्या व दुसरी परिस्थिती म्हणजे वेलीमध्ये कॅल्शीयम व मॅग्नेशीयमचे असंतुलन यामुळे घडाचा सुकवा दिसून येईल. ही गरज पूर्ण करण्याकरिता मण्यात पाणी उतरण्याच्या आधी वेलीच्या गरजेप्रमाणे अन्नद्रव्याची पूर्तता करावी. कॅल्शीयम व मॅग्नेशीयमची उपलब्धता फवारणी किंवा जमिनीतून ६ ते ८ मिमी किंवा १२ ते १४ मिमी आकारापर्यंत किंवा फळछाटणीच्या ७० दिवसापर्यंत दिल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात. पुढील काळात कमतरतेमुळे तापमानात बदल होताच सुकवा दिसुन येतो. तेंव्हा आपण फवारणी करतो व त्याचा परिणाम मिळत नाही.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या