कांदा सल्ला: रब्बी कांद्याचे नियोजन
13 February 07:00

कांदा सल्ला: रब्बी कांद्याचे नियोजन


कांदा सल्ला: रब्बी कांद्याचे नियोजन

१. फवारणीद्वारे सूक्ष्म द्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी द्यावी.
२. जर प्रोफेनोफॉस १ मिली अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी अगोदरच केली असल्यास आवश्यकतेनुसार फिप्रोनील १ मि.ली. अधिक प्रोपिकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
३. कीड व रोगाच्या नियंत्रणाकरिता आवश्यकतेनुसार कार्बोसल्फान २ मि.ली. अधिक ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस आहे.
४. लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास गंधक २ ग्रॅम किंवा डायकोफॉल २ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
५. बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसांपूर्वी बंद कराव्या.
६. डेंगळे आलेले कांदे दिसल्यास त्वरित काढून टाकावे.
७. पिकाला आवश्यकतेनुसार वेळोवेळी पाणी देत राहावे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या