कांदा सल्ला: कांदा व लसूण साठवण करताना काळजी घ्या
07 February 07:00

कांदा सल्ला: कांदा व लसूण साठवण करताना काळजी घ्या


कांदा सल्ला: कांदा व लसूण साठवण करताना काळजी घ्या

रांगडा कांदा व लसूण साठवणीकरिता
१. कांद्याची सड व कोंब येऊ नये याकरिता साठवणुकीतील कंदांवर नियमितपणे देखरेख ठेवावी. सडलेले तसेच पिचलेले कांदे तात्काळ काढून टाकावेत. कांदा चाळीत हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी.
२. कांद्याचे ढीग फक्त ४ - ५ फूट उंचीपर्यंत ठेवून योग्य प्रकारे पसरवावे.
३. लसणाच्या गड्या पातींसह हवादार चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवावे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या