लिंबूवर्गीय पिक सल्ला: अशी घ्या आंबिया बहारातील बागेची काळजी
06 February 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: अशी घ्या आंबिया बहारातील बागेची काळजी


लिंबूवर्गीय पिक सल्ला: अशी घ्या आंबिया बहारातील बागेची काळजी

१) आंबिया बहारातील झाडांना पाण्याचा खंड पडू देऊ नये. ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन केलेले असल्यास बाष्पोत्सर्जनाच्या ८० % पाणी द्यावे. दंडाने पाणी देत असल्यास ओलीताकरिता दुहेरी आळे पद्धतीचा अवलंब करावा. पूर्ण वाढ झालेल्या संत्रा झाडाला प्रती झाड ८० लिटर पाणी द्यावे. तसेच पूर्ण वाढ झालेल्या (५ ते ६ मिटर घेर) असणाऱ्या लिंबू झाडाला ६४ लिटर पाणी प्रती दिन प्रती झाड द्यावे.
२) आळ्यामध्ये गवताचे पालापाचोळ्याचे १० ते १५ सेमी थर देता येतील किंवा पॉलीथीनचे आच्छादन वापरावे.
३) फळांचे संख्या वाजवीपेक्षा जास्त असल्यास फळांची झाडावरील संख्या कमी करावी. इथेफॉन ६०० पीपीएम संजीवकाचा वापर करूनसुद्धा (फळे वाटाण्याएवढी झाल्यावर) फळांची संख्या कमी करता येईल.
४) सेंद्रिय संत्रा उत्पादन घेत असल्यास ८ वर्ष व मोठ्या झाडाची अन्नद्रव्य गरज पूर्ण करण्याकरीता गांडूळ खत ६० किलो + ट्रायकोडर्मा हरजियानम ४० मिली + अॅझाडीरॅक्टीन १ % + सुडोमोनास फ्ल्युरोसन्स ४० मिली प्रती वर्ष प्रती झाड यांचा वापर करावा.
५) नवतीसोबतच सायला, पाने पोखरणारी अळी यांचा उपद्रव संभवतो नियंत्रणाचे उपाय अमलात आणावे.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे,
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)टॅग्स

संबंधित बातम्या