हळद सल्ला: हळदीची काढणी करताना काळजी घ्या
05 February 07:00

हळद सल्ला: हळदीची काढणी करताना काळजी घ्या


हळद सल्ला: हळदीची काढणी करताना काळजी घ्या

• हळदीची काढणी करताना वरंब्यातील गड्ड्याच्या तीन ते पाच सेमी समोर कुदळ एकाच ठिकाणी एक ते दोन वेळा जोराने मारून दांडा उलट दिशेने दाबल्यास गड्डा सर्व हळकुंडासह उलटा होतो. मात्र कुदळ वेगवेगळ्या ठिकाणी मारल्यास गड्डा फुटून हळकुंडे फुटण्याची शक्यता जास्त असते.
• हा निघालेला गड्डा सरीवर उलट दिशेने २-३ दिवस उन्हामध्ये वाळवल्यास चिकटलेली माती निघण्यास मदत होते व नंतर हा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात.
• हळदीमध्ये विशेषतः काढणीवर मजुरीचा खर्च जास्त होतो त्यासाठी हळद जर गादीवाफ्यावर लावली तर ‘हळद काढणी यंत्रा’द्वारे काढणी करता येते. त्यासाठी दोन गादीवाफ्यातील अंतर १२० सेमी असावे. अंतर कमी असेल तर हळद ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून खराब होते.
• जमिनीच्या प्रतीनुसार काढणीसाठी कमीत कमी ३५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर वापरावा. हळद काढणीपुर्वी जमीन पूर्ण वाळलेली असावी.

डॉ. जितेंद्र कदम,
काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा.टॅग्स