केळी सल्ला: मृग बागेतील केळीची काळजी घ्या
04 February 07:00

केळी सल्ला: मृग बागेतील केळीची काळजी घ्या


केळी सल्ला: मृग बागेतील केळीची काळजी घ्या

• केळीचे घड ०.५ मिमी जाडीच्या ७५ X १०० सेमी च्या सच्छिद्र प्लास्टिक पिशव्यांनी झाकावेत.
• घड पक्वतेच्या अवस्थेतील बागेला, एक हजार केळी झाडांसाठी साडे पाच किलो युरिया व सात किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रती आठवडा द्यावे.
• केळीचा खोडवा घ्यावयाचा असल्यास मुख्य पिक निसवल्यानंतर तीन महिन्यांनी एक जोमदार पिल प्रती झाड ठेवावे.
• केळी पिकाला पाण्याचा ताण पडू न देता गरजेइतका पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मृग बाग केळीसाठी २० ते २२ लिटर पाणी प्रती झाड प्रती दिवस देणे आवश्यक आहे.

डॉ. विक्रांत भालेराव,
सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, धुळेटॅग्स

संबंधित बातम्या